अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन


अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन

१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य
संमेलन - पिंपरी चिंचवड २०२४


स्मरुया इतिहास वैभवशाली शतकाचा, पायाभरणी करूया भविष्यातील प्रवासाचा
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन ही एक चळवळ आहे. या चळवळीला शंभर वर्षांची अतिशय गौरवास्पद अशी परंपरा आहे. या संमेलनामुळे नाट्य कलाकारांना एक नवी ऊर्जा, नवचैतन्य मिळते तर नाट्य रसिकांमध्येही एक नवा उत्साह संचारतो. बालगंधर्व, अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, कृष्णाजी प्रभाजी खाडीलकर, पुरुषोत्तम दारवेकर अशा दिग्गजांनी अजरामर केलेला मराठी नाट्य क्षेत्राचा वैभवशाली इतिहास स्मरण्याची आता वेळ आली आहे. चला शतक महोत्सवी नाट्यसंमेलनात सामील होऊन नव्या जुन्या उत्तमोत्तम नाटकांचा आनंद लुटुयात.

शतकमहोत्सवी नाट्य संमेलन - मुहूर्तमेढ एका प्रेरणापर्वाची
१०० वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन हा नाट्य क्षेत्रातील एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. प्रदीर्घ अन वैभवशाली परंपरा लाभलेल्या मराठी नाटकांच्या प्रवासातील हा एक ऐतिहासिक सोहळा आहे. विशेषतः मराठी नाट्यसंमेलनाच्या आजवरच्या इतिहासातील हा एक मैलाचा दगड म्हणून गणला जाईल. वर्तमान परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी करीत असलेल्या नाट्यकर्मींना यामुळे निश्चितच चालना मिळेल. शिवाय पुढील वाटचालीचा आराखडाही निश्चित केला जाईल. म्हणूनच हे नाट्यसंमेलन भविष्यातील एका प्रेरणपर्वाची मुहूर्तमेढ रोवेल आणि अखिल भारतीय मराठी नाट्यसृष्टीला एक नवसंजीवनी बहाल करेल.



मा. श्री. प्रशांत दामले

मा. श्री. प्रशांत दामले

अध्यक्ष - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती शाखा, मुंबई
मा. श्री. भाऊसाहेब भोईर

मा. श्री. भाऊसाहेब भोईर

उपाध्यक्ष - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती शाखा, मुंबई
अध्यक्ष - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड
डॉ. पी. डी. पाटील

डॉ. पी. डी. पाटील

कुलपती - डॉ. डी. वय. पाटील विद्यापीठ

मा. श्री. प्रकाश धारिवाल

मुख्य संचालक - धारिवाल ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज

मा. श्री. राजेशकुमार साकला

कार्याध्यक्ष, अ. भा. म. ना . प. पिं. चिं.

मा. श्री. कृष्णकुमार गोयल

उपाध्यक्ष, अ. भा. म. ना . प. पिं. चिं.

+ नाटके

+ कलाकार

+ कलाकृती

+ लोक कलाकार

व्हिडिओ

मुख्य आकर्षण - मराठी नाटके व लोक कला

प्रमुख पाहुणे



मा. श्री. शरद पवार साहेब
स्वागताध्यक्ष
मा. श्री. एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. श्री. देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. श्री. अजितदादा पवार
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
पालकमंत्री, पुणे जिल्हा

मा. श्री. उदय सामंत
मुख्य निमंत्रक, अ. भा. म. ना . प
उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. डॉ. जब्बार पटेल
नियोजित अध्यक्ष,
१०० वे अ. भा. मराठी नाट्य संमेलन
मा. श्री. सुधीर मुनगंटीवार
सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्र राज्य
मा. श्री. नाना पाटेकर
प्रमुख अतिथी

पिंपरी-चिंचवड मधील सांस्कृतिक चळवळीचे शिल्पकार

श्री भाऊसाहेब भोईर यांनी १९९६ साली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेची स्थापना केली. ७९ व्या नाट्यसंमेलनाचे शिवधनुष्य त्यांनी समर्थपणे पेलले आणि यशस्वी करून दाखविले. त्यांनी स्वतः काही नामवंत मराठी चित्रपटांची, नाटकांची निर्मिती केली असून नेहमीच अनुभवी तसेच नवोदित कलाकारांना, लेखकांना प्रोत्साहन दिले आहे. मध्यवर्ती परिषदेचे ते उपाध्यक्ष आहेत तर पिंपरी-चिंचवड शाखेचे सर्वेसर्वा अध्यक्ष आहेत. मराठी नाटक-सिनेमाबद्दल विशेष आस्था असलेले ते प्रभावी मार्गदर्शक आहेत. चित्रपट निर्मितीचा, नाटकातील अभिनयाचा अनेक दशकांचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात त्यांनी भरीव आणि दिशादर्शक योगदान दिले आहे.








सप्रेम नमस्कार,

मी, भाऊसाहेब भोईर, अध्यक्ष, मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा आणि उपाध्यक्ष, १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन, आपणांस सविनय प्रणाम करतो. मराठी नाटक हा आपल्या सर्वांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय! आणि पिंपरी-चिंचवड येथे संपन्न होत असलेले शतक महोत्सवी नाट्यसंमेलन ही आपल्यासाठी अगदी विशेष महत्त्वाची बाब आहे. एक दर्दी नाट्यरसिक म्हणून मी आपणांस ६ व ७ जानेवारी रोजी संपन्न होत असलेल्या नाट्यसंमेलनातील विविध उपक्रमांत हिरीरीने सहभागी होण्याचे स्नेहपूर्वक निमंत्रण देतो. हा आपला सोहळा आहे आणि आपल्या सर्वांना तो यशस्वीपणे पार पाडायचा आहे. तुमचा सहभाग आमचा उत्साह द्विगुणित करेल आणि अनेक उत्तमोत्तम नाटके अन कार्यक्रमांची रेलचेल असलेले हे संमेलन संस्मरणीय करण्यासाठी आम्हाला प्रेरणा देईल.

तेव्हा वेळात वेळ काढून अवश्य या. या महासोहळ्याचा आनंद लुटा...



Sonsors